निलेश राणेंच्या माध्यमातून संविता आश्रमाला 50 बेड उपलब्ध !

PM मोदींच्या वाढदिवस सेवा पंधरवड्याचं निमित्त
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: September 17, 2023 16:35 PM
views 241  views

कुडाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सेवा पंधरवडा म्हणून 17 ऑक्टोबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत साजरा होणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत माजी खासदार निलेश राणे यांनी पणदूर येथील संविता आश्रम येथे 50 बंक बेड उपलब्ध केले आहेत, यामुळे या आश्रमातील 50 रुग्णांची व्यवस्था होणार आहे. 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा दिवशी माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले होते. यावेळी दादा साईल यांनी आश्रमाच्या रुग्णांना झोपण्याची गैरसोय होत असल्याने 50 बंक बेड या आश्रमास देण्याची मागणी माजी खासदार निलेश राणे यांच्याकडे केली होती.

 त्याची पूर्तता करत आज माजी खासदार निलेश राणे यांनी सविता आश्रम येथे दाखल होत संस्थेचे व्यवस्थापक श्री कामत यांच्याकडे 50 बंक बेड सुपूर्द केले. यावेळी जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई,  मंडल अध्यक्ष दादा साईल, संजय वेंगुर्लेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य दीपक नारकर, विनायक राणे, पप्या तवटे, युवा मोर्चा मंडल अध्यक्ष रुपेश कानडे, माजी नगरसेवक सुनील बांदेकर, योगेश घाडी, तुषार सावंत आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.