कुडाळ आगाराच्या 5 नव्या बसेसचं लोकार्पण

Edited by:
Published on: June 14, 2025 16:20 PM
views 231  views

कुडाळ : कुडाळ एस.टी. आगारासाठी कुडाळ - मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या विशेष पाठपुराव्यानंतर महायुती सरकारमार्फत मंजूर झालेल्या ५ नवीन एस.टी. बसेस (लालपरी) आज औपचारिकरित्या लोकार्पित करण्यात आल्या.

या नव्या बसेसमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांना अधिक सुविधा, वेळेत सेवा आणि सुरक्षित प्रवास मिळेल. लोकांच्या सेवेसाठी झटणाऱ्या परिवहन कर्मचाऱ्यांनाही ही भर घडवणारी ठरेल.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, दादा साईल, दीपक नारकर, विनायक राणे, निलेश तेंडुलकर, यंत्र अभियंता सिंधुदुर्ग सुजित डोंगरे,  स्थापित्य अभियंता श्री. केंकरे, आगार प्रमुख रोहित नाईक, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.