
मंडणगड : जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचे आदेशाने सन 2025 ते 2030 या पाच वर्षांचे कालावधीसाठीचे मंडणगड तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे प्रवर्ग निहाय आरक्षण 22 एप्रिल 2025 रोजी कायम करण्यात आले याकरिता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात तहसिलदार अक्षय ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली सोडतीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला या कार्यक्रमास निवासी नायब तहसिलदार संजय गुरव, महसुल नायब तहसिलदार सुदर्शन खानविलकर सहाय्यक महसुल अधिकारी सचिन गोवळकर, मंडळ अधिकारी प्रकाश साळवी, अमित शिगवण, निलेश गोडघासे, संतोष गायकवाड, सुरज गायकवाड यांच्यासह तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरक्षण सोडतीसाठी 1995 सालापासूचे ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण व 2011 चे लोकसंख्येच्या प्रमाणातील नमुद प्रवर्गाची टक्केवारी लक्षात घेण्यात आली. त्यानुसार अनुसचित जाती प्रवर्गासाठी दहागाव व सोवेली या ग्रामपंचायती राखीव झाल्या यात या दहगाव या ग्रामपंचायतीसाठी महिला आरक्षण पडले. अनुसुचीत जमाती प्रवर्गासाठी कादवण, तिडे तळेघर व घोसाळे या 3 ग्रामपंचायती राखीव करण्यात आल्या यातील कादवण ग्रामपंचायमध्ये महिला आरक्षण पडले. नागरीकांच्या मागास प्रवर्गासाठी तेरा ग्रामपंचायती राखील करण्यात आल्या. यातील बाणकोट, भोळवली, दाभट, जावळे, पाट, विन्हे, तुळशी, या ग्रामपंचायतीमध्ये नागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव हे आरक्षण पडले. तर भिंगळोली, लाटवण, मुरादपुर, उमरोली, वाल्मिकीनगर, देव्हारे या ग्रामपंचातीमध्ये नागरीकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण हे आरक्षण पडले. खुल्या प्रवर्गासाठी दुधेरे बामणघऱ, कुडुकखुर्द, माहू-बोरघर, पणदेरी, पालघर, पालवणी, पिंपळगाव, पाले, शिरगाव, सावरी, तोंडली, उन्हवरे, उंबरशेत, वेळास, वलौते, घराडी या ग्रामपंचायतीमध्ये सर्वसाधारण महिला राखीव हे आऱक्षण पडले. बहिरवली, कुंबळे, म्हाप्रळ, वेसवी, अडखळ, चिंचघर, कोंडगाव, निगडी, पेवे, पिंपळोली, पडवे, शिगवण, सडे, लोकरवण, गोठे या ग्रामपंचायती सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्या.
2020 साली तालुक्यातील 14 ग्रामपंचायतीचे आरक्षण काढण्यात आले होते. त्यानुसार या चौदा ग्रामपंचायतीमध्ये इच्छुकांनी आपली मोर्चा बांधणी केली होती. मात्र ते आरक्षण रद्द होऊन नव्याने आरक्षण जाहीर झाल्याने हिरमोड झालेल्या अनेकांची नाराजी या कार्यक्रमात व्यक्त झाली.
तालुक्यातील भिंगळोली, कुंबळे, म्हाप्रळ, देव्हारे, बाणकोट, वेसवी, पंदेरी या ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्रात व्यापार उद्योगांची झपाट्याने वाढ होत आहे. या गावातून तालुक्यातील आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होते गत पाच वर्षात या कार्यरच असलेल्या आरक्षणाचे परस्पर विरोधी आरक्षण जाहीर झाल्याने गुडघ्याला बाशींग बांधून तयार बसलेल्या अनेकांचा हिरमोड झालेला दिसून आला.