
देवगड : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने देवगड तालुक्यातील इच्छुक उमेदवारांना नांमनिर्देशन अर्ज वितरण सुरू असून पहिल्या दिवशी ९ अर्ज वितरीत झाले होते. तर दुसऱ्या दिवशी ७ तर आज तिसऱ्या दिवशी देखील मोठ्या प्रमाणवरती २६ अर्जांची विक्री झाली असून एकूण आतापर्यंत ४२ अर्जांच वितरण झाले आहे. वितरणासाठी सज्ज असलेली प्रशासकीय यंत्रणा सुलभ रित्या सर्वांच मार्गदर्शन देखील या निमित्ताने करताना दिसत आहे.










