निलेश राणेंच्या माध्यमातून देऊळवाडा सातेरी मंदिरास 400 डिशेस !

निलेश राणेंसाठी दत्ता सामंतांचं देवी चरणी गाऱ्हाणं
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 19, 2023 17:41 PM
views 115  views

मालवण : देऊळवाडा सातेरी मंदिर येथे माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांनी 400 ताटे (डिश) मंदिरास भेट स्वरूपात दिली आहेत.

नवरात्र उत्सव काळात मंदिरात दर दिवशी भाविकांना महाप्रसाद असतो. तसेच अन्य कार्यक्रमही असतात. सर्वांचा विचार करता भाविकांना प्रसाद (भोजण)  व्यवस्थेसाठी ताटे (डिश) उपलब्ध झाल्यास सोईचे ठरेल. याबाबत माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी दत्ता सामंत यांचे लक्ष वेधले. दत्ता सामंत यांनी तात्काळ  400 ताटे मंदिरास भेट देण्याचे मान्य केले. त्यानुसार गुरुवारी सकाळी सातेरी मंदिर येथे समस्त सातेरी मित्रमंडळ, घाडी परिवार, गावकर परिवार यांच्या उपस्थितीत ताटे भेट स्वरूपात देण्यात आली. निलेश राणे बहुमताने आमदार होऊ देत असे साकडे यावेळी दत्ता सामंत यांच्या माध्यमातून देवी चरणी घालण्यात आले.

यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, जगदीश गावकर, आप्पा लुडबे, संजय लुडबे, मंदार लुडबे, ललित चव्हाण, राजू बिडये, कमलाकर कोचरेकर, रमेश गांवकर, विजय गांवकर यासह सातेरी मित्रमंडळ, घाडी परिवार, गावकर परिवार, स्थानिक नागरिक उपस्थित होते.  

सातेरी देवी हे जागृत देवस्थान आहे. देवीने आम्हाला सेवा करण्याची संधी दिली. यापुढेही देवीच्या सेवेसाठी आम्ही तत्पर राहू. मंदिर परिसरात पेवर ब्लॉक बसवण्याचा आमचा मानस आहे. सातेरी देवी ती सेवाही पूर्ण करून घेईल. असे दत्ता सामंत यांनी सांगितले. यावेळी देवस्थानच्या वतीने मानकरी रमेश गांवकर यांच्याहस्ते दत्ता सामंत यांचा सत्कार करण्यात आला.