भोसले नॉलेज सिटीच्या ४० विद्यार्थ्यांची सिप्लामध्ये निवड

Edited by: विनायक गांवस
Published on: May 14, 2024 11:42 AM
views 260  views

सावंतवाडी : यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी व यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची गोवा येथील सिप्ला या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये कॅम्पस इंटरव्हयूद्वारे  निवड करण्यात आली आहे. यामध्ये फार्मसीच्या ३७ व पॉलिटेक्निकच्या ३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

भोसले फार्मसी हे नॅक मान्यताप्राप्त व भोसले पॉलिटेक्निक हे एनबीए मानांकन प्राप्त कॉलेज आहे. सिप्लासोबत दोन्हीही कॉलेजचा सामंजस्य करार झालेला असून गेली चार वर्षे येथील विद्यार्थ्यांना सिप्लामध्ये नोकरीची संधी उपलब्ध होत आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, बी फार्मसी प्राचार्य डॉ. विजय जगताप, डी.फार्मसी प्राचार्य सत्यजित साठे  इंजिनिअरिंग प्राचार्य डॉ.रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.