आपत्तीग्रस्त कुडतरकर कुटुंबाला चार लाखांची मदत...!

नितेश राणेंच्या हस्ते धनादेश सुपूर्द
Edited by: उमेश बुचडे
Published on: July 12, 2023 15:20 PM
views 348  views

कणकवली : शिरवल येथील प्रचिती प्रशांत कुडतरकर हिचा ओढ्याच्या  पाण्यात वाहून मृत्यू झाला होता. शासनाच्या नैसर्गिक आपत्ती अंतर्गत अशा आपत्तीग्रस्त कुटुंबाला चार लाखांची मदत दिली जाते. त्यानुसार चार लाखाचा धनादेश प्रशांत कुडतरकर यांचेकडे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी तहसीलदार आर. जे. पवार, तलाठी अर्जुन गुनावत, महादेव बाबर आधी उपस्थित होते.