शाबास स्कॉलर ! ; कणकवलीतील पार्थ राणे स्कॉलरशिपमध्ये सिंधुदुर्गात तिसरा

Edited by: उमेश बुचडे
Published on: July 15, 2023 14:41 PM
views 471  views

कणकवली : आठवी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये कणकवली मधलीवाडी येथील पार्थ संदीप राणे  याला 81% गुण मिळवून त्याने जिल्ह्यामध्ये तिसरा क्रमांक मिळवला आहे. पार्थ सेंट उर्सुला  स्कूल वरवडे चा विद्यार्थी आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 

त्याने या इंग्लिश माध्यमाच्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी खूप मेहनत घेतली होती.अभ्यास देखील तो मन लावून करत होता. त्यामुळेच मला यश प्राप्त झाले असं त्याने सांगितले. त्याला प्राप्त झालेल्या उत्तुंग यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.