कुडाळातील 39 तलाठी सजा कार्यालये 8 दिवसांपासून बंद !

नागरिकांची गैरसोय
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 25, 2023 16:16 PM
views 215  views

कुडाळ : अतिरिक्त कार्यभार असलेल्या तलाठ्यांनी तालुक्यातील 39 सजा कार्यालये 16 ऑक्टोबर पासून बंद ठेवली आहेत. तहसीलदार अमोल फाटक यांना निवेदन देत या कार्यालयांच्या चाव्या तहसीलदार यांच्या कडे जमा करण्यात आल्या आहेत. मात्र यामुळे तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. 

तालुक्यातील तलाठ्यांनी 16 ऑक्टोबर पासून अतिरिक्त कार्यभार असलेली 39 तलाठी कार्यालय बंद ठेवत आंदोलन पुकारले आहे. ई फेरफार, ई चावडी, ई पिक पाहणी या मध्ये येणाऱ्या अडचणी दुर व्हाव्यात यासाठी तहसीलदारांना निवेदन देत कार्यालयाच्या चाव्या जमा करत तलाठ्यांनी अतिरिक्त कार्यभार असलेली कार्यालये बंद ठेवली आहेत.

तब्बल नऊ दिवस उलटूनही तलाठ्यांचा संप अद्याप मिटलेला नाही. त्यामुळे तालुक्यातील सर्व सामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. तालुक्यात सुमारे तीन लाखाहून अधिक सातबारे आहेत. तालुक्यातील नागरिकांना न्यायालयीन प्रकरणासाठी लागणारे सातबारे वेळेत मिळत नसल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात रोष  व्यक्त केला आहे.तरी प्रशासनाने तातडीने तलाठ्यांच्या आंदोलनाबाबत निर्णय घेत त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी ही सर्वसामान्य नागरिक करत आहे.