वैभववाडीत 17 ग्रा.प.निवडणुकीसाठी 370 अर्ज ; सरपंच पदासाठी 47 तर सदस्यासाठी 223

उंबर्डे गावातून सर्वाधिक 38 एवढे अर्ज दाखल
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 02, 2022 20:10 PM
views 433  views

वैभववाडी : तालुक्यातील 17  ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता 370 अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये सरपंच पदाच्या 17 जागांसाठी 47 तर सदस्य पदाच्या 125 जागांसाठी 223 अर्ज दाखल झाले आहेत. पाच ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची तर चार ग्रामपंचायती पुर्णतः निवडणूक बिनविरोध झाली आहे. उंबर्डे गावातून सर्वाधिक 38 एवढे अर्ज दाखल झाले आहेत.

     ग्रामपंचायत निवडणुकीकरिता आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती. सरपंच पदाच्या 17 जागांकरिता 47 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच सदस्य पदाच्या 125 जागांसाठी 223 जणांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. यामध्ये सरपंच पदासाठी निमअरुळे, गडमठ,उपळे,जांभवडे ,अरुळे या पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यापैकी अरुळे या गावात सदस्य पदाकरिता निवडणूक लागण्याची शक्यता आहे.