
सावंतवाडी : रत्नसिंधू योजनेच्या माध्यमातून तब्बल 37 हजार लाभार्थ्यांना आतापर्यंत लाभ देण्यात आला आहे. आत्तापर्यंत कोट्यावधी रुपयांचा निधी यामध्ये खर्च करण्यात आला आहे. महिलांसाठी काथ्या उद्योग, शेळीगट वाटप, कुक्कुटपालन योजना तर मत्स्यविक्रेत्या महिलांना उद्योग प्रकल्पासाठीही भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला असून लाभार्थ्यांनी महिन्याभराच्या आत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. रत्नसिंधू योजनेची बैठक त्यांच्या उपस्थित सावंतवाडी न.प.त पार पडली. यावेळी ते बोलत होते.
नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात ही बैठक पार पडली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. मंत्री केसरकर म्हणाले, रत्न सिंधू योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी जिल्ह्यात दीडशे ठिकाणी छोटी हॉटेल उभारण्यात येणार असून त्यासाठी लाभार्थी ही निवडण्यात आले आहे. यासाठी एकूण वीस लाख रुपये एवढा खर्च असून त्यापैकी दहा लाख रुपयाचा सबसिडी रक्तसिंधू योजनेतून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
तर सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे टुरिझम सुरू करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. त्या ठिकाणी असलेली पाण्याची अडचण लक्षात घेता साडेचार कोटी रुपयांच्या माध्यमातून वेगळी व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. तर सावंतवाडी रोड असे नामकरण करण्यात आलेल्या ठिकाणी सावंतवाडी रेल्वे टर्मिनस असं नाव देण्यात यावे अशा प्रकारच्या सूचना आपण जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत अशी माहिती दिली.
तर यशवंतगडाच्या दुरुस्तीसाठी पुरातत्त्व खात्याकडे अडीच कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्यातून यशवंत गडाची दुरुस्ती करण्यात येणार आहे. टीडीसी च्या माध्यमातून केरळ सारखे बॅकवॉटरमध्ये सुरू असणारे पर्यटन येथील तेरेखोल नदीत सुरू करण्यासाठी हाऊस बोट सुरू करण्याचा प्रयत्न आहेत. जिल्ह्यातील नापणे, सावडाव धबधब्याच्या ठिकाणी सुशोभीकरण रेस्टॉरंट आधी गोष्टीही निर्माण करण्यात येणार आहेत. सावंतवाडीच्या नरेंद्र डोंगरावर दोन कोटी तीस लाख रुपयांच्या निधीतून दृष्ट्या विकास करण्यात येणार आहे. यामध्ये झाडावर शेवटी घरे तयार करणे ही गोष्टीतून आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. तर महिलांसाठी वेत्ये येथे काथ्या उद्योग प्रकल्प साडेतीन कोटी रुपयांतून उभा केला जाणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने जमीन देण्याचे कबूल केले आहे. महिलांना महिला बचत गटांना कुक्कुटपालनासाठी निदी देण्यात आला आहे. मच्छीमार महिलांना इ स्कूटर खरेदी करण्यासाठी निधी देण्यात आला आहे. आंबोली धबधब्याच्या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता वनविभागाला चार गाड्या देण्यात आल्या. या गाड्यांच्या माध्यमातून येणाऱ्या पर्यटकांना धबधबाच्या ठिकाणी आणण्यात येणार आहे. तर पर्यटकांच्या गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था अन्य ठिकाणी केली जाणार आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती शाळा आहेत ही संख्या लक्षात घेता गणेश मूर्ती कलाकारांना कॉम्प्रेसर, गन आणि माती मळण्याचे मशीन खरेदी करण्यासाठी 50 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. आंबोली सारख्या ठिकाणी दरीत पडलेल्या व्यक्तींना रेस्क्यू करून वर करण्यासाठी आपत्कालीन विभागाकडे 67 लाख रुपये देण्यात आले आहे. त्यामुळे रत्नसिंधूच्या माध्यमातून जिल्ह्याचा लवकरच कायापालट केल्या जाणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.