कोचऱ्यातील 37 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ !

मंत्री केसरकरांच्या माध्यमातून निधी मंजूर
Edited by: दिपेश परब
Published on: January 16, 2024 09:38 AM
views 215  views

वेंगुर्ले : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर  झालेल्या कोचरे गावातील विविध ३७ लाख रुपये किमतीच्या विकासकामांची भूमिपूजन शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर व कोचरे सरपंच योगेश तेली यांच्या हस्ते १५ जानेवारी रोजी संपन्न झाली. 

     जिल्हा वार्षिक योजना २०२२-२३ लेखाशिर्ष अंतर्गत कोचरा मायने गोसावीवाडी येथील ओहोळावर साकव बांधणे या कामासाठी २५ लाख, कोचरा मायने वेतोबा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे या कामासाठी ८ लाख व राज्यशासनाच्या ग्रामविकास विभागाच्या सन २०२३- २४ अंतर्गत लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरवणे अंतर्गत कोचरा मायने गोसावीवाडी येथे गणेश विसर्जन घाट बांधणे ४ लाख असा मिळून एकूण ३७ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, सरपंच योगेश तेली, उपसरपंच गुरूनाथ शिरोडकर, शिवसेना विभाग प्रमुख संजय परब, ग्रामपंचायत सदस्य अनिल सुतार, संजय गोसावी, प्रगती राऊळ, माजी उपसरपंच अनंत म्हापणकर, देवदत्त साळगावकर, कोचरे सोसायटी माजी चेअरमन ब्रिजेश तायशेट्ये, आबा कोचरेकर, श्री खडपकर, विलास राऊळ, महेश गोसावी, आपा राऊळ, सुशील राऊळ, ज्ञानेश्वर राऊळ, पांडुरंग राऊळ, योगेश राऊळ, पांढरी राऊळ यांच्यासाहित ग्रामस्थ उपस्थित होते.