पत्रकारितेतील ३५ वर्षे | तुळशीदास नाईक यांचा विशेष सन्मान

Edited by:
Published on: January 14, 2024 08:08 AM
views 135  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुका निर्मितीपूर्वी ते आजतागायत तब्बल ३५ वर्षे ग्रामीण व शहरी भागात  पत्रकारितेत योगदान देणारे दोडामार्ग तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास नाईक यांचा नुकताच दोडामार्ग येथे एका विशेष आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. त्याकाळी साधन सुविधा नसतानाही पत्रकारिता सुरू केलेलं नाईक आज आज बदलत्या डिजीटल युगातही  बातमीच्या मुळाशी जाऊन आपल्या निर्भिड पञकारीतेचा वसा जपत आहेत अशा शब्दात यावेळी उपस्थित मान्यवरांनी जेष्ठ पत्रकार तुळशीदास नाईक यांचे काम खरोखरच अतुलनीय आहे अशा शब्दांत उपस्थित मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या . 

दोडामार्ग तालुक्यात डिजिटल मिडियात काम करणाऱ्या पत्रकारांनी या विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होत. येथील लक्ष्मीबाई सिताराम हळबे काॅलेजमध्ये हा अभिष्टचिंतन सोहळा नुकताच पार पडला. यावेळी व्यासपीठावर कसर्ई दोडामार्ग नगरपंचायतचे  नगराध्यक्ष चेतन चव्हाण, जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक सुर्यकांत परमेकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, एकनाथ नाडकर्णी, माजी समाजकल्याण सभापती व पञकार अंकुश जाधव,   शिवसेना दोडामार्ग तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस, शिवसेना उध्दव ठाकरे उपजिल्हा प्रमुख बाबुराव धुरी, नगरसेविका संध्या परमेकर, नगरसेवक सिताराम खडपकर,   साटेली भेडशी सरपंच छाया धर्णे, युवा उद्योजक दत्ताराम उर्फ बाबा टोपले, डॉ, उमेश देसाई, कोनाळचे माजी सरपंच पराशर सावंत, सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार,  महादेव चारी, संजय विरनोडकर, अरुण गंवडळर, विष्णू मुंज, प्राध्यापक प्रज्ञाकुमार  गाथाडे, यांच्यासह अनेक मंडळी उपस्थित होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अमित सामंत, उबाठाचे तालुकाध्यक्ष संजय गवस, दशरथ मोरजकर, लक्ष्मण आयनोडकर, तसेच तळकट माजी सरपंच रामचंद्र सावंत यांनीही नाईक यांना शुभेच्छा दिल्या. 

दिपप्रज्वलन व दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर तालुक्यातील सामाजिक, राजकीय, आरोग्य, कला, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या काही मंडळीना शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले. तसेच अन्य काही पञकार यांचा देखील गौरव करण्यात आला. यावेळी या उपक्रमाचे कौतुक करत विविध क्षेत्रातून उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून पञकार तुळशीदास नाईक यांच्या प्रदीर्घ पत्रकारिता क्षेत्रातील वाटचाल विशद केली. गेल्या अनेक वर्षापासून ते ग्रामीण ते शहरी भागात  पञकारीता करत आले, इतकचं नव्हे तर आजही तरुणांना प्रेरणा देईल असं त्यांचं या क्षेत्रात काम आहे. पत्रकारिता बदलत गेली.अनेक बदल झालेत, आज डिजिटल चा बोलबाला आहे. मात्र या साऱ्या टप्प्यानंतर नाईक आजही तितक्याच ताकदीने दर्पणकार बाळशास्त्री यांच्या वारसा पुढे नेत आपली पत्रकारिता करत असल्याचे सांगितले. तर नाईक यांनीही आपल मनोगत व्यक्त करत या पत्रकारिता वाटचाली मधील अनेक अनुभव कथन केले. पत्रकार क्षेत्रात त्याकाळी दिवस-रात्र पायी चालत नंतर सायकल प्रवास आणि आता दुचाकी, चारचाकी प्रवास, ब्लॅक अँड फोटो, कोडेक कॅमेरा ते आता अड्रैवड मोबाईल अशा उजाळा दिला.  दोडामार्ग तालुक्याचा विकास आणि समाजहित केंद्रस्थानी मानून आपली पत्रकारिता राहिल्याचेही त्यांनी आवरजून नमूद केले. त्यांच्या माध्यमातून अनेक तरुण पत्रकारांनाही या क्षेत्रात करिअर करता आले.  तळागाळातील घडामोडी, समस्या, अडचणी, आपत्ती, क्राईम, अशा हजारो बातम्या लिहून त्यांनी सर्व सामान्यांना न्याय देण्यासाठी आपली लेखणी  आजवर सुरू ठेवली आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लवू परब, सुञसंचालन सुमित दळवी यांनी केलं. यांनी प्रतिक राणे यांनी आभार मानले.