
वैभववाडी : पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून वैभववाडी तालुक्यातील सुमारे ३२० माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थिनींना द केरळा स्टोरी २ हा चित्रपट दाखविण्यात आला. कणकवली येथील चित्रपट गृहात विद्यार्थीनींनी हा चित्रपट अनुभवला. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना सामाजिक वास्तव आणि जागरूकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थिनींनी या चित्रपटाचा लाभ घेतला. विद्यार्थिनींना सामाजिक विषयांबाबत जागरूक करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.
यावेळी भाजपा महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष प्राची तावडे, नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, जिल्हा परिषद सदस्या श्रावणी रावराणे, नेहा माईणकर, सुवर्णा संसारे, शारदा कांबळे तसेच इतर भाजपा महिला पदाधिकारी व शिक्षिका उपस्थित होत्या.या उपक्रमाचे विद्यार्थिनी तसेच पालकांकडून स्वागत करण्यात आले.











