सिंधुदुर्गात ७२,७५५ घरगुती गणपती

32 सार्वजनिक गणपती होणार विराजमान
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: August 25, 2025 20:49 PM
views 74  views

सिंधुदुर्ग :  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण म्हणजे गणेश चतुर्थी या सणाला सिंधुदुर्गातील प्रत्येक घरामध्ये गणपती बाप्पांचे आगमन होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७२हजार ७५५ एवढे घरगुती गणपती विराजमान होणार आहेत. तर 32 सार्वजनिक गणपती विराजमान होणार आहेत. 

सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे नेहमी सण उत्सव साजरे करणारा जिल्हा. या जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिले आहे या जिल्ह्याचा सर्वात महत्त्वाचा सण जर कोणता असेल तर तो म्हणजे गणेश चतुर्थी या सणाला सर्व कोकणवासी आपल्या आपल्या घरी येत असतात. पुणे मुंबई आदी शहरे यामुळे या अकरा दिवसात रिकामी होत असतात या सणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात फार मोठे महत्त्व आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबामध्ये या गणपतीचे मनोभावे पूजन केले जाते काही ठिकाणी दीड दिवस काही ठिकाणी पाच दिवस काही ठिकाणी सात दिवस नऊ दिवस तर 11 दिवसांपर्यंत गणरायांना आपल्या घरामध्ये आणून त्यांची मनोभावे पूजा केली जाते. गणपती बाप्पा घरी येणे म्हणजे आपल्या घरातील कोणी माणूसच घरी आल्यासारखे सर्वांना वाटत असते सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रमाण कमी आहे.  मात्र घरोघरी गणेशाचे पूजन केले जाते तरी अलीकडे सार्वजनिक गणेशोत्सवांचे संख्या वाढताना दिसत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 32 एवढे सार्वजनिक गणेशोत्सव आहेत. यामध्ये दोडामार्ग तालुक्यात चार बांद्यामध्ये एक सावंतवाडी सात वेंगुर्ला मध्ये तीन कुडाळ चार वैभववाडी 4 कणकवली 5 देवगड एक आचरा एक आणि मालवण दोन असे एकूण 32 ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो.  

   72 हजार 755 घरगुती गणेशोत्सव 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सवपेक्षा घरगुती गणेशाचे प्रमाण जास्त आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण ७२७५५ एवढे गणपती घरी आणले जाणार आहेत. यामध्ये दोडामार्ग तालुक्यात 6032 बांद्यामध्ये 2680 सावंतवाडी तालुक्यात 10000103 वेंगुर्ला मध्ये 5432 नियुक्ती 3302 कुडाळ 8613 सिंधुदुर्ग नगरी 2495 वैभववाडी 5345 कणकवली 9710 विजयदुर्ग 5572 देवगड 6540 आचरा 2425 आणि मालवण 4506 मिळून एकूण 72 हजार 755 एवढे घरगुती गणपती विराजमान होणार आहेत.