जिल्हयात ग्रामसडक योजनांतर्गत 318 कोटी मंजूर

तांत्रिक बाबींमुळे काही कामे अपूर्ण
Edited by: उमेश बुचडे
Published on: January 14, 2024 14:25 PM
views 311  views

कणकवली : पंतप्रधान ग्रामसडक योजना(पीएमजीएसवाय) व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना (सीएमजीएसवाय) या दोन योजनांतर्गत सिंधुदुर्ग जिल्हयातील 110 रस्त्यांची कामे प्रस्तावित असून यासाठी 318 कोटी रु. निधी मंजूर आहे. यातील प्रधानमंत्री ग्रामसडकमधील 10 कामे मार्गी लागली असून उर्वरित कामे काही तांत्रिक त्रूटी, चढया दराच्या निविदा यामुळे प्रलंबित आहेत. यातील काही कामांच्या पुन्हा निविदा काढण्यात येणार असून अनेकवेळा निविदा काढूनही प्रतिसाद मिळाला नाही अशा कामांच्या निविदांमध्ये आवश्यक बदल करण्याचा शासन स्तरावर विचार सुरू आहे. याबाबत सोमवार 15 जानेवारी रोजी मंत्रालयीन स्तरावर बैठक होणार असून या बैठकीत काही सकारात्मक निर्णय होतील अशी माहिती प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कुडाळ कार्यालयाचे  उपअभियंता आर. पी. सुतार यांनी दिली. 

जिल्हयातील ग्रामसडक योजनांतर्गत कामांची स्थिती व मंजूर निधी याबाबत माहिती घेण्यासाठी उपअभियंता श्री. सुतार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, जिल्हयात पीएमजीएसवाय व सीएमजीएसवाय अशा दोन सडक योजनांतर्गत एकूण 110 रस्त्यांची कामे प्रस्तावित आहेत. या सर्व रस्त्यांचे तांत्रिक आराखडे पूर्ण झाले असून शासनाने यासाठी 318 कोटी रु. एवढा निधी मंजूर केला आहे. यामध्ये पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या 11 पॅकेज अंतर्गत 30 रस्त्यांची कामे मंजूर असून यासाठी 105 कोटी रु. निधी मंजूर आहे. यातील 4 पॅकेज अंतर्गत 10 रस्त्यांच्या कामांना योजनेच्या राज्यस्तरीय समितीकडून कार्यारंभ आदेश 2 जानेवारी 2024 रोजी प्राप्त झाले आहेत. ही कामे तात्काळ सुरु करण्यात येणार आहेत. देवगड, कणकवली, सावंतवाडी व मालवण तालुक्यातील रस्ते कामांचा यात समावेश असून यासाठी 37 कोटी रु. मंजूर आहेत.तसेच

1 ते 5 टक्के एवढया जादा दराने निविदा भरल्या आहेत. या निविदा मंजूर करण्याबाबत सोमवारी मंत्रालयात होणार्‍या बैठकीत ठोस निर्णय होईल अशी शक्यता श्री. सुतार यांनी व्यक्त केली. ही कामे मालवण, कणकवली, वैभववाडी व सावंतवाडी तालुक्यातील आहे. 

उद्या मंत्रालयात विशेष बैठक 

राज्यभरातील ग्रामसडक योजनांतर्गत मंजूर रस्ता कामे, यातील निविदा प्रक्रिया, मंजूर व नामंजूर निविदा व त्यामागील कारणे, तांत्रिक कारणांनी नाकारलेल्या निविदा, चढया दराच्या निविदा तसेच ज्या कामांसाठी निविदा भरल्याच गेल्या नाहीत याबाबतचा आढावा घेवून धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे. या बैठकीला ग्रामसडक योजनांचे मुख्य अभियंता तसेच अधीक्षक व कार्यकारी अभियंता उपस्थित राहणार आहेत. वारंवार निविदा काढूनही त्या भरल्या जात नाहीत अशा कामांच्या निविदा काढण्याबाबत काही महत्वाचे निर्णय या बैठकीत होतील अशी माहिती पीएमजीएसवायचे उपअभियंता आर.पी. सुतार यांनी दिली.