पारपोली-देवसू-दानोली रस्त्याला डांबरीकरणासाठी वाढीव ३० लाख मंजूर

Edited by: विनायक गावस
Published on: July 22, 2023 15:30 PM
views 148  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून वाढीव रू. ३० लाख रुपये निधी पारपोली-देवसू-दानोली रस्त्याच्या डांबरीकरणासाठी मंजूर झालेला आहे. सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये सार्वजनिक बांधकामच्या बजेट मधून या निधीची तरतूद झाली आहे अशी माहिती माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी दिली आहे.


मागील मार्च महिन्याच्या अर्थसंकल्पामध्ये या रस्त्याला ५० लाख रुपये मंजूर केले होते.  मंजूर कामामध्ये देवसू नागझरी येथील चढावापासून खराब संपूर्ण रस्ता तसेच देवसु चर्च परिसरात खराब झालेला रस्ता धरून एस्टिमेट बनवण्यात आले होते. 

पारपोली गावातील राहिलेल्या खराब रस्ते डांबरीकरण करण्याच्यासाठी वाढीव निधीची आवश्यकता होती. ही गरज ओळखून आज रू.३० लाख (तीस लाख रुपये) हे फक्त पारपोली मधील खराब झालेली लांबी दुरुस्त करण्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत.

पावसाळ्याच्या समाप्तीनंतर दसरा किवा दिवाळीपासून नव्याने वाढीव मंजूर केलेले रू.३० लाख व मागील मंजूर झालेले रू.५० लाख (ज्याचे याधी टेंडर झाले आहे) अशा एकूण रूु.८० लाखांच्या कामाची सुरुवात लवकर होईल 

तसा पाठपुरावा कार्यकारी अभियंता सावंतवाडी बांधकाम विभाग यांच्याशी करून घेवू, नकारात्मक कृतीला सकारात्मक कामातून दिलेले हे उत्तर आहे. सध्या चालू असलेले खड्डे भरण्याचे काम ह्याचा मंजूर कामांशी म्हणजे रू.३० लाख किंवा रु.५० लाख च्या निधीशी कोणताही संबंध नाही असं मत संदीप गावडे यांनी व्यक्त केले.

नव्याने झालेल्या निधी मंजुरी बद्दल पारपोली भाजपचे व निधी मंजूर करणारे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आभार त्यांनी मानले आहेत.