सावंतवाडी : सायन्स ऑलिंपियाड फाउंडेशन मार्फत घेण्यात आलेल्या 'इंटरनॅशनल जनरल नॉलेज ऑलिंपियाड' परीक्षेत यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या ३ विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल मिळवत सुयश प्राप्त केले. परीक्षेला एकूण पस्तीस विद्यार्थी बसले होते आणि सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
गोल्ड मेडल मिळवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये दुसरीतील सान्वी संतोष पोरे, तिसरीतील अर्णव राहुल शेवाळे आणि सहावीतील सानिका आत्माराम नाईक या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंत भोसले, सचिव संजीव देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक व मुख्याध्यापिका प्रियांका देसाई यांनी अभिनंदन केले.