
देवगड : रत्नागिरी व सिंधुदुर्गातील ३ जैन पदाधिकाऱ्यांची जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनाझेशन (जितो)जेटीआर पदी नियुक्ती करण्यात आली असून यात अजित शिराळकर (रत्नागिरी) मिलिंद मांगले (देवरुख) दयानंद मांगले (देवगड-सिंधुदुर्ग) यांचा समावेश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील जेष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते दयानंद मांगले यांची Jain International Trade Organization (जितो) या जैन समाजाच्या आंतरराष्ट्रीय अग्रगण्य सामाजिक व व्यावसायिक, उद्योजक आणि प्रोफेशनल्स यांची जागतिक संघटना असून व्यवसाय नेटवर्किंग, शिक्षण, समाजसेवा आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे.
रत्नागिरी सिंधुदुर्ग मधील जेटीआर नियुक्तीमुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे. अजित शिराळकर, मिलिंद मांगले, दयानंद मांगले हे जैन समाजाच्या विविध संघटनाचे पदाधिकारी असून जैन सामाजिक कार्यात सातत्याने पुढाकार घेणारे, समर्पित व कार्यक्षम व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत.त्यांनी यापूर्वीही अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि उद्योजकीय उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्यांच्या अनुभव संपन्न नेतृत्वामुळे सिंधुदुर्ग परिसरातील जैन समाजाला नवे बळ मिळणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.विशेषतः जैन समाजातील सुशिक्षित बेकार युवक,नवउद्योजक तसेच गरजू घटकांसाठी मार्गदर्शन,संधी व सहकार्य उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे. समाजातील प्रगतीसाठी एकजूट वाढवणे,व्यवसायिक नेटवर्क मजबूत करणे आणि सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबवणे या क्षेत्रांत यांचे योगदान निश्चितच मोलाचे ठरणार आहे.
नाशिक येथे झालेल्या JTR झोनल काँनकलेव्ह मध्ये त्यांची निवड करण्यात आली आहे,रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जितो या इंटरनॅशनल संघटनेचे ते पहिले जेटीआर आहेत,“समाजातील गरजू जैन बांधवांसाठी शिक्षण,आरोग्य आणि रोजगार या क्षेत्रांत प्रभावी काम करण्यावर आपला भर राहील.सर्व घटकांना सोबत घेऊन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहीन.”या वेळी कोल्हापूर विभाग प्रमुख रविंद्र देवमोरे यांनी विशेष अभिनंदन शुभेच्छा व्यक्त केल्याया प्रसंगीजितो चे चेअरमन विमल संघवी, चीफ सेक्रेटरी नंदन नाहर, डायरेक्टर इंचार्ज विजय वेदमुथा, डायरेक्टर वर्किंग कमिटी कमलेश सोजरिया, जितो रोम झोन चेअरमन राजेंद्र जैन,चीफ सेक्रेटरी तृप्ती कर्णावट ,जेटीआर झोन कर्व्हर्नर निखिल कोठारी ,जितो नाशिक चापटर चेअरमन दिनेश ढोका,चीफ सेक्रेटरी धीरज पीचा ,जेटीआर कॉनर्व्हर किरण भंडारी उपस्थित होते.










