लाच प्रकरणी 'त्या' अधिकाऱ्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी | एकावर अटकेची टांगती तलवार

Edited by: विनायक गावस
Published on: October 13, 2023 17:57 PM
views 715  views

सावंतवाडी : एक लाखाची लाच स्वीकारल्याच्या गुन्ह्यात सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांना सोमवार पर्यंत 3 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी एस. डी. चव्हाण यांनी पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील अन्य आरोपी असलेले पोलीस उपनिरीक्षक सूरज पाटील यांना अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे प्रकृती अस्वास्थ्यामुळे जिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचार घेत असलेल्या उपनिरीक्षक सूरज पाटील यांच्यावर सुद्धा अटकेची टांगती तलवार आहे.