ट्रान्सफार्मरसाठी सिंधुरत्नमधून ३ कोटी ९८ लाखांचा निधी..!

Edited by: विनायक गावस
Published on: January 27, 2024 07:28 AM
views 498  views

सावंतवाडी : शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध भागामध्ये ट्रान्सफार्मर बसविण्यासाठी सिंधुरत्न योजूनतून ३ कोटी ९८ लक्ष ९५ हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे जनतेमधून समाधान व्यक्त होत आहे.

सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्हयामधील नैसर्गिक साधनसंपत्तीचे परिणामकारक नियोजन करुन या दोन जिल्हयाचा सर्वकष विकास करण्याच्या दृष्टीने सिंधुरत्न समृद्ध योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचे अध्यक्ष मंत्री दीपक केसरकर आहेत. तसेच माजी आमदार प्रमोद जठार व किरण उर्फ भैय्या सांगत हे सदस्य आहेत.जिल्हयातील विविध भागात विज वितरणकडून पुरविण्यात येणाऱ्या विजेबाबत समस्या निर्माण झालेल्या होत्या. पुरेशा विद्युत दाबाने विजपुरवठा न होणे ही त्यातील एक मोठी समस्या होती. जिल्हयातील ग्रामीण भागातील लोकांकडून तसेच सिंधुरत्न योजना समिती सदस्यांकडून संबंधित ठिकाणी ट्रान्सफार्मर मंजूर करणेबाबत वारंवार मागणी होत होती. ही गरज लक्षात घेऊन सिंधुरत्न समृद्ध योजनेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी जिल्हयातील एकूण ४२ ठिकाणी विद्युत ट्रान्सफार्मर मंजूर केले आहेत. यासाठी ३ कोटी ९८ लक्ष ९५ हजार मंजूर करण्यात आलेले आहेत. यातील ५० टक्के निधी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडे वर्ग करण्यात आलेला आहे. या योजनेअंतर्गत खालील कामांना मंजूरी देण्यात आलेली आहे. वेतोबा मंदिर, आरवली,

फणसखोल, कोंडूरा वायंगणी, बांदा बांदेश्वर मंदिर, देवसू पलिकडचीवाडी, आंबोली बाजारपेठ, आंबोली कावळेसाद पॉईट, सोनुर्ली गावठण? भोगवे बीच, खवणे मारुती मंदिर,श्रीरामवाडी कोचरा, करपेवाडी रेडी, आचरा बीच मालवण, तोंडवली तळाशील मंदिराशेजारी, कुणकेश्वर ता. देवगड, विजयदुर्ग, मेढा, मोबर देवबाग, रामघाट रोड, भावईवाडी कोचरा, साटेली भेडशी, सिंधुदुर्गनगरी नवीन बस स्थानक, माडखोल घवडकी उद्यमनगर माजगांव, उभादांडा नमसवाडी, कोंडुरा वायंगणी, आडाळी एमआयडीसी, बॅ. नाथ मेमोरियल हॉल, केम्प, ओटवणे मायबा कनक्युअल, कपीलवाडी ओटवणे, परमे भेडशी, कुरंगवणे ता. कणकवली, घोणसरी खवळे भाटले ब्राम्हणदेववाडी, नारिंग्रे भंडारवाडी देऊळवाडी, पाटयर ता. देवगड, मुणगे भगवती मंदिर बांबरवाडी देवगड, पुरल तांबळकाटे, कोळंब खडवलनाका ता. मालवण, पाट मारुतीमंदिर गोसावीवाडी, पाट मडवळवाडी माटकरवाडी, भेकुर्ली, धाकोरे आदी ठिकाणी हे टान्सफार्मर मजूर करण्यात आले आहेत.