आचरा ग्रा. पं. निवडणूक ; सरपंचपदासाठी 3, सदस्यपदांसाठी 29 उमेदवार रिंगणात

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 25, 2023 16:55 PM
views 327  views

मालवण : मालवण तालुक्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या आचरा ग्रामंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पाच नोव्हेंबर रोजी होत आहे. बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदाचे चार तर सदस्य पदाचे सहा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. आता निवडणूक रिंगणात सरपंच पदासाठी 3 तर 13 सदस्य पदांसाठी 29 उमेदवार निवडणूक रिंगणात असणार आहेत. 

दरम्यान, उमेदवारांचा मागणी क्रमानुसार चिन्ह वाटप करण्यात आले आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संदीप गावडे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मुरारी भालेकर यांनी दिली आहे. 


उमेदवारांना देण्यात आलेले निवडणूक चिन्ह : 

सरपंच पदासाठी तीन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यातील जेरॉन फर्नांडीस यांना कप बशी, जगदीश पांगे यांना शिट्टी, मंगेश टेमकर यांना नारळ हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. 

सदस्य पदांसाठी प्रभाक एक मधून तीन जागांसाठी 7 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यातील नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या विभागात प्रिया मेस्त्री (गॅस सिलिंडर), सारिखा तांडेल (पतंग), सर्वसाधारण महिला - गौरी सारंग (टोपली), पूर्वा तारी (छताचा पंखा), प्रियता वायंगणकर (शिवणयंत्र). सर्वसाधारण - मुज्जफर मुजावर (बॅट), चंद्रशेखर मुणगेकर (कपाट).

प्रभाग दोन मधून तीन जागांसाठी 8 उमेदवार रिंगणात आहे. सर्वसाधारण महिला : प्राजक्ता देसाई (पतंग), अनुष्का गावकर (गॅस सिलिंडर), शाहीन काझी (टेबल लँप), सायली सारंग (शिवणयंत्र), सुकन्या वाडेकर (छताचा पंखा). सर्वसाधारण - सचिन बागवे (कपाट), योगेश गावकर (बॅट), जगदीश पांगे (शिट्टी).

प्रभाग तीन मधून दोन जागांसाठी चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला - श्रद्धा सक्रू (गॅस सिलिंडर), श्रुती सावंत (शिवणयंत्र). सर्वसाधारण - चंद्रकांत कदम (बॅट), अनिकेत मांजरेकर (कपाट). 

प्रभाग चार मध्ये दोन जागांसाठी चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सर्वसाधारण महिला - युगंधरा मोरजे (गॅस सिलिंडर), हर्षदा पुजारे (शिवणयंत्र). सर्वसाधारण - महेंद्र घाडी (बॅट), सदानंद घाडी (कपाट). 

प्रभाग क्रमांक पाच मध्ये तीन जागांसाठी सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्ग - पंकज आचरेकर (पतंग), चंदन पांगे (गॅस सिलिंडर), सर्वसाधारण महिला - किशोरी आचरेकर (शिवणयंत्र), अमृता गावकर (छताचा पंखा). सर्वसाधारण - संतोष मीराशी (बॅट), माणिक राणे (कपाट) याप्रमाणे उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले.