भांडूपला रंगणार २५ वा कोकण महोत्सव

४ ते १५ जानेवारी दरम्यान आयोजन
Edited by: रुपेश पाटील
Published on: December 16, 2022 19:50 PM
views 286  views

प्रमोद कांदळगावकर 

मुंबई : उत्सव परिवार, श्री गणेश मित्र मंडळ व श्री समर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून भांडूप पश्चिमेच्या कोकणनगर येथील स्व. अटलबिहारी वाजपेयी मैदान, (मनपा‌ मैदान) येथे बुधवार दिनांक  ४ जानेवारी ते रविवार दिनांक १५ जानेवारी २०२३

या कालावधीत २५ वा भव्य 'कोकण महोत्सव'चे आयोजन सुप्रिया सुजय धुरत यांनी केले आहे.

 या महोत्सवात कोकणातील प्रसिद्ध दशावतार कंपन्यांची नाटके, विविध कोकणी नृत्य, नमन, भारुडे, बालानृत्ये, सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत नाटक, संगीत भजनाची डबलबारी, महिलांसाठी खेळ, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, खेळ पैठणीचा, लोकरंग सांस्कृतिक मंच प्रस्तुत गणगौळण लावणी बतावणीचा कार्यक्रम, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, विविध स्पर्धा, लहान मुलांसाठी फनफेअर होणार आहे.

महोत्सवात सुप्रसिद्ध जेडी कराओके गायनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच कोकणातील मालवणी मसाले, मासळी, विविध खाद्यपदार्थांचे स्टॉलही उभारले जातील, अशी माहिती कोकण महोत्सवाचे आयोजक सुजय धुरत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

 उत्सव परिवाराचे अध्यक्ष सुजय धुरत, सुप्रिया धुरत, दिलीप हिरनाईक, मानसी धुरत, सुरेश सावंत, संतोष राणे, किशोर गावडे, विजय जोशी, प्रदीप भाबल, राज धुरत, दीपक धुरत, विनायक सनये, प्रसाद येरम, दिलीप परब या महोत्सवाच्या जय्यत तयारीला लागले आहेत. दरम्यान, यंदाच्या आयोजनाबाबत सुजय धुरत म्हणाले की, कोकणाचे पर्यटन आणि खाद्य संस्कृती याला चालना देण्यासाठी भांडूप पश्चिममध्ये सलग २५ वा कोकण महोत्सव आयोजित केला जाणार आहे.

 यंदाचे कोकण महोत्सवाचे रौप्यमहोत्सवी वर्ष असून 

महोत्सवाची जोरदार तयारी सुरू केली आहे, असे सुप्रिया धुरत यांनी सांगितले. यावेळी उद्योजक, व्यावसायिकांना आपल्या उद्योग समूहाची जाहिरात करण्यासाठी नाविन्यपूर्ण योजना हाती घेतली असून, अनेकांनी आपल्या उद्योगाच्या जाहिराती नोदविल्या आहेत. अधिक माहितीसाठी सुजय धुरत,

९९८७१७३०३४, मानसी धुरत ९३७२८१४८०९, दिलीप हिरनाईक ९९६९००६७७४ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सुजय धुरत यांनी केले आहे.