२२ जानेवारी इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस : नारायण राणे

Edited by:
Published on: January 21, 2024 12:38 PM
views 369  views

वेंगुर्ले : देशभरात अयोध्येच्या राममंदिरचीच चर्चा आहे. लोक भारावून गेले आहेत. ५०० वर्षांत जे शक्य झाले नाही ते आता २०२४ मध्ये शक्य झाले. हा वेगळा आनंद आहे. २२ जानेवारी आम्हा सर्व भारतीयांसाठी इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस. इथे पक्ष, जात, धर्म याचा प्रश्न नाही. आपल्या प्रभू श्रीरामाची प्रतिष्ठापना होत आहे याचा आनंद सर्वांना असायला पाहिजे असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वेंगुर्ला येथे बोलताना केले. भाजपा तर्फे आयोजित मंदिर स्वच्छता अभियानात आज मंत्री नारायण राणे यांनी वेंगुर्ले येथे सहभाग घेतला. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेले मंदिर स्वच्छता अभियान १४ जानेवारीपासून सुरू झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज २१ जानेवारी रोजी वेंगुर्ला येथील श्री सातेरी मंदिर येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजप तर्फे आयोजित मंदिर स्वच्छता अभियान कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला.

प्रथम त्यांनी श्री देवी सातेरीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर स्वच्छता अभियान करून त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी संबोधित करताना केंद्रीय मंत्री राणे म्हणाले की, २०१४ साली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले आणि त्यांनी त्याठिकाणी राम मंदिर बनविण्याचा निर्धार केला. २२ जानेवारी रोजी श्री रामाची प्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. आपल्या देशातील जो इतिहास आहे त्या इतिहासात सुवर्णक्षराने लिहिणारा हा क्षण आहे. सिधुदुर्गासहीत वेंगुर्ल्यातील कार्यकर्ते ही धार्मिक आहेत. प्रामाणिक आणि निष्ठेचे वलय तुमच्यामध्ये आहे. याचा प्रत्यय तुम्ही आम्हाला देता आहात असेही मंत्री नारायण राणे म्हणाले.

यावेळी सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, शरद चव्हाण, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, प्रणव वायंगणकर, जयंत मोंडकर, हेमंत गावडे, पुंडलिक हळदणकर, वसंत तांडेल, दादा केळुसकर, प्रशांत आपटे, सातेरी देवस्थानचे दाजी परब, रवी परब, सुनिल परब, सुधाकर परब, प्रसाद परब, सहदेव परब, जयवंत परब, संजय परब, राजन परब, सुनिल परब, स्वप्निल परब, वासुदेव परब, मंगेश परब, रविद्र परब, नितेश परब, उमेश परब, निखिल घोटगे, सुशेन बोवलेकर,प्रज्ञा परब यांच्यासह भाजपाच्या महिला पदाधिकारी शितल आंगचेकर, श्रेया मयेकर, कृपा मोंडकर, साक्षी पेडणेकर, पूनम जाधव, सुजाता पडवळ तसेच वेंगुर्ला नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते. याच कार्यक्रमात कारसेवक प्रशांत धोंड यांचा सन्मान नारायण राणेंच्या हस्ते करण्यात आला. ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरच्या उर्वरित बांधकामासाठी निधी मिळावा अशा आशयाचे निवेदन यावेळी ट्रस्टतर्फे श्री. राणे यांना देण्यात आले.