
वेंगुर्ले : म्हापण ग्रामपंचायत सरपंच पदासाठी होत असलेल्या तिरंगी लढतीसाठी सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. म्हापण ग्रामपंचायत येथे चार प्रभागांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडत असून येथे सरपंच पदासाठी तीन उमेदवार रिंगणात आहे तर सदस्य पदासाच्या ११ जागेसाठी जवळपास २७ सदस्य रिंगणात असून त्यातील एक जागा बिनविरोध झाल्याने प्रत्येक्ष २६ उमेदवार सदस्य पदाच्या रिंगणात आहे. या ग्रामपंचायतसाठी सर्व पॅनलने उमेदवारांनी आपली ताकद पणाला लावल्याने चारही प्रभागातून मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या भागांमध्ये ११.१५ मि.पर्यत २० टक्के मतदान पार पडल्याचे सांगितले.