वानिवडेत मनसेचे नितीन पवार यांच्यामार्फत 2 सौरदीप प्रदान !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: November 27, 2023 18:02 PM
views 142  views

देवगड : नुकत्याच झालेल्या वानिवडे ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर  नितिन पवार सह संपर्क अध्यक्ष याच्या हस्ते विजयी ग्रामपंचायत सदस्य उमेदवार निलेश राघव, मनोज तांबे , निलेश कोतेकर व गोविंद कोतेकर यांच्या जवळ वानिवडे गावासाठी दोन सौरदीवे प्रदान करण्यात आले.

निवडणूकीच्या निकालानंतर नितिन पवार यांनी स्वखुषीने आणि स्वखर्चातून दहा सौरदिवे देण्याचे आश्वासन दीले होते. आणि त्या प्रमाणेच बोले तैसा चाले या उक्ती प्रमाणे आज आपला शब्द पूर्ण केला. या पुढे टप्प्याटप्प्याने आणखी आठ सौर दिवे देण्यात येणार असल्याचे नितिन पवार यांनी जाहीर केले. या प्रसंंगी नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष संतोष मयेकर, बबलु परब, रुपेश पांगम, सिद्धार्थ जाधव आणि ईतर वानिवडे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.