
दोडामार्ग : साटेली भेडशी मुस्लिम वाडी येथे विद्युतधारित शॉक लागून दोन शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला तर शेळ्या पालन करणाऱ्या बसला. घटना सोमवारी दुपारी साटेली भेडशी मुस्लिम वाडी येथे घडली.इलियस फेकीन फर्नांडिस व त्यांचा मुलगा हे शेतकरी हे पितापुत्र आपल्या मालकीच्या शेळ्यां सकाळी चरावयास नेल्या होत्या. शेळ्यां चरवून दुपारी घरी माघारी फिरत असताना मुस्लिमवाडी येथील रस्त्यावरून येत असताना रस्त्या शेजारी असणाऱ्या विद्युत लोखंडी खांबाजवळ गेले असता अचानकपणे दोन शेळ्यांना मोठा विद्युत शॉक लागला. यात दोन शेळ्यां जागीच मृत्युमुखी पडल्या. तर बाकीच्या शेळया सैरावैरा पळू लागल्या. या घटनेने शेतकरी पितापुत्र घाबरून गेले इतर शेळ्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करीत असताना त्या दोघांनाही विजेचा धक्का बसला. मृत्युमुखी पडलेल्या दोन शेळ्या व विजेचा धक्का लागून जखमी झालेल्या या घटनेने फर्नांडिस यांचे मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्य इस्माईल चांद यांनी घटनास्थळी पोहचून मदतकार्य केले तसेच या घटनेची माहिती साटेली भेडशी विद्युत वितरण कार्यालय यांना दिली व स्थानिक वायरमन याना घटनास्थळी येण्यास पाचारण केले.सरपंच छाया धर्णे यांनी घटनास्थळी येत पाहणी केली.वायरमन प्रितेश पेळपकर,मनोज सावंत, गोविंद गवस,सागर शिंपी, यांनी घटनास्थळी येत विद्युत खांबावर आलेल्या झाडांच्या फांद्या, वेली यांची साफसफाई केली तसेच येथील विद्युत वाहिन्या यांची दुरुस्ती करून व वीजपुरवठा सुस्थितीत करत संबंधित विद्युत लोखंडी खांबाला विजेचा धक्का येत नसल्याची खात्री केली. जी घटना घडली तेथील विद्युत खांबांवर मोठ्या प्रमाणात झाडांच्या वेलीं वाढलेल्या होत्या तसेच सद्या सुरू असलेला पाऊस यामुळे अचानकपणे विद्युत प्रवाह जमिनीपर्यंत आला असावा आणि त्याच वेळी शेळया वेली खात असता विजेचा धक्का लागला असा अंदाज व्यक्त केला आहे. या मृत्युमुखी पडलेल्या शेळ्यांचा पशुवैद्यकीय अधिकारी यांनी पंचनामा करत शवविच्छेदन केले यावेळी विजेचा धक्का लागून या शेळ्यांचा मृत्यू झाला असे स्पष्ट केले.