
सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालय येथे दोन भुलतज्ञ रूजू होणार आहे. यासाठी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी सिव्हिल सर्जन डॉक्टर श्रीपाद पाटील यांना निवेदन मागणी केली होती.
भूलतज्ञ नसल्याने रूग्णांची परवड होणार होती. हे लक्षात घेऊन जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी सिव्हिल सर्जन डॉक्टर श्रीपाद पाटील यांना निवेदन दिले होते. डॉक्टर पाटील यांनी दोन भूलतज्ञ आठवड्यातून प्रत्येकी तीन दिवसांसाठी सावंतवाडीस दिले आहेत. भूलतज्ञ दिल्याने डॉक्टर श्रीपाद पाटील यांचे जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी आभार मानले आहे.