SPK ची सायली सावंत पॉवर लिफ्टिंगमध्ये प्रथम

Edited by:
Published on: February 10, 2025 14:39 PM
views 270  views

सावंतवाडी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे विद्यमाने आयोजित राज्यस्तर शालेय पॉवर लिफ्टिंग क्रीडा स्पर्धेत श्री पंचम खेमराज कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी येथील इयत्ता अकरावी विज्ञान शाखेची खेळाडू कुमारी सायली सखाराम सावंत हिने ५२ किलो वजनी गटामध्ये राज्यस्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

तिच्या या उत्तुंग यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य  जयप्रकाश सावंत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. एम. ए. ठाकूर कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक व्ही. पी. राठोड, क्रीडा विभागाचे शिक्षक आर. एम. सावंत के. पी. लोबो, कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.