
आचरा : जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या मालवण तालुक्यातील आचरा ग्रामपंचायतीसाठी शांततेत मतदान प्रक्रिया असून झाली आहे. सकाळी साडे दहा वाजेपर्यंत सरासरी दहा ते पंधरा टक्के मतदान होते. प्रभाग क्रमांक पाच मधील वरची वाडी केंद्र शाळा नंबर एक मधील मशीन मध्ये बिघाड झाला होता. सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी बिघाड झाला होता. अखेर 8 वाजून 55 मिनिटांनी नवीन मशीन बसविण्यात आले. त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु होती. तहसीलदार वर्षा झालटे यांनीही मतदान केंद्राला भेट दिली होती. या निवडणुकीसाठी भाजपा शिवसेना युती आणि ठाकरे गट महाविकास आघाडी यांच्यात चुरस निर्माण झाली आहे. भाजपा शिवसेना युतीचे सरपंच पदाचे उमेदवार जेरॉन फर्नांडीस विरुद्ध शिवसेना ठाकरे गट आणि महाविकास आघाडीचे मंगेश टेमकर तर अपक्ष म्हणून जगदीश पांगे निवडणूक रिंगणात आहेत. मात्र खरी लढत ही जेरॉन फर्नांडीस आणि मंगेश टेमकर यांच्यात थेट लढत होत आहे.