कोकण रेल्वेच्या 15 गाड्यांना सिंधुदुर्गात थांबा द्या

पुखराज राजपुरोहित यांनी वेधलं मंत्री भाजपच्या वरिष्ठांचे लक्ष
Edited by: विनायक गावस
Published on: June 30, 2023 11:40 AM
views 222  views

सावंतवाडी : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सुमारे १५ रेल्वे गाड्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात थांबा देण्यात आलेला नाही याकडे भाजपाचे राष्ट्रीय परिषद सदस्य पुखराज राजपुरोहित यांनी मंत्री, भाजपाच्या वरिष्ठांचे लक्ष वेधले आहे.कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सुमारे १५ रेल्वे गाड्यांना रत्नागिरी ते मडगाव दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकाही रेल्वे स्टेशनवर थांबा मिळाला नाही तो दिला पाहिजे असे पुखराज राजपुरोहित यांनी म्हटले आहे.


भारतामध्ये पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग ओळखला जातो. सरकारने तशी घोषणाही केली आहे. त्यामुळे पर्यटन जिल्हात रेल्वे गाड्यांना थांबा मिळाला तर पर्यटकांची संख्या वाढेल असे त्यांनी म्हटले आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांना थांबा मिळाला नाही. त्यात तिरुनवेली जामनगर,एर्नाकुलम निजामुद्दीन, कोचिवेली अमृतसर, गांधीधाम हमसफर, लोकमान्य तिलक टर्मिनस गरीब रथ, एर्नाकुलम एलटीटी दुरंतो, मडगांव चंडीगढ़ कोचूवेली ऋषिकेश, कोयंबटूर हिसार, त्रिवेंद्रम निजामुद्दीन, कोचूवेली पोरबंदर, त्रिवेंद्रम दिल्ली राजधानी सम्पर्क क्रांति, चेन्नई जोधपुर या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे, असे त्यांनी सांगितले.