सावंतलाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला किडनी डायलीसिस युनिट व आरओ प्लांट करिता पंधरा लाखाची तातडीने निधी आवश्यकता असल्याने माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर तसेच शिवसेना जिल्हाध्यक्ष अशोक दळवी यांनी मोलाचे सहकार्य करून निधी प्राप्त करून दिल्याबद्दल जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी रुग्णांच्या वतीने धन्यवाद देऊन आभार मानले आहेत.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे किडनी डायलिसिस युनिट तसेच डायलिसिस युनिट साठी लागणारे आर ओ प्लांट यासाठी 15 लाख रुपयाची निधी आवश्यक होते. माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर यांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत तातडीने निधी दिले. यासाठी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अशोक दळवी यांना सर्व बाबीची कल्पना दिली. त्यांनी माजी मंत्री केसरकर यांच्यामार्फत आमदार स्थानिक विकास योजनेअंतर्गत 15 लाखाची निधी तातडीने आवश्यकता असल्यानन पाठपुरावा करावा. याला यश आलं असून जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी त्यांचे आभार मानले आहे.