
मंडणगड : तालुका विधी सेवा समिती, दापोली अंतर्गत दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर मंडणगड येथे 22 मार्च 2025 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. मंडणगडे दिवाणी न्यायाधीश, न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग श्री. एम. ए. शिंदे यांनी पॅनल प्रमुख म्हणुन आणि वकील श्री. एस. बी. जाधव यांनी पॅनल सदस्य म्हणुन काम पहिले. या लोकअदालतीमध्ये वादपूर्व 1217 प्रकरणे तसेच प्रलंबित असणारे 140 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 15 प्रलंबित असणारी प्रकरणे व 198 वादपूर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यामध्ये एकुण रक्कम रुपये 25,45,907/- इतकी रक्कम वसुली करण्यात आली आहे. लोकअदालतमध्ये मंडणगड बार असोसिएशन चे अध्यक्ष वकील मिलींद लोखंडे, वकील सचिन बेर्डे व वकील सुमेश घागरूम यांचे सहकार्य लाभले. लोकअदालत मध्ये न्यायालयीन कर्मचारी श्री. के. ए. पेढांबकर, सहा. अधीक्षक यांनी कामकाज पहिले.