खारेपाटण चेकपोस्टवर दारूसह १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Edited by: उमेश बुचडे
Published on: January 14, 2024 07:38 AM
views 432  views

कणकवली : मुंबई गोवा महामार्गावर कणकवली खरेपाठण येथे गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी कणकवली पोलिसांनी खारेपाटण चेकपोस्टवर एकाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून ट्रकसह दारू असा १४ लाख ७४ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

लक्ष्मण भागाराम रेबारी (वय ४३, रा. आमेट-राजस्थान) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई काल रात्री साडेअकरा वाजता करण्यात आली. खारेपाटण चेकपोस्टवर गाड्यांची तपासणी सुरू असताना ट्रक चालक लक्ष्मण भगाराम रेबारी याच्याकडे गाडीची कागदपत्रे सोबत सापडली नाही, तसेच त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नव्हते. संशय बळावल्याने पोलिसांनी ट्रकची पाहणी केली असता हौद्यात ५१२ बॉक्समधील प्रत्येक बॉक्समध्ये १८० मिली. मापाच्या ४८ अशा एकूण २४ हजार ५७६ बाटल्या आढळून आल्या. ट्रकचालक लक्ष्मण रेबारीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास एपीआय मनोज पाटील करत आहेत.