तिलारी शेटवेवाडी येथे कुलपुरुष देवस्थानचा १३ वा वर्धापनदीन

Edited by: संदीप देसाई
Published on: March 13, 2024 15:07 PM
views 87  views

दोडामार्ग : तिलारी शेटवेवाडी येथील श्री कुलपुरुष देवस्थानचा १३ वा वर्धापन दिन सोहळा  गुरुवारी १४ मार्च २०२४ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनिशी संपन्न होत आहे. या  कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी व तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तेथील ग्रामस्थानी केलं आहे.

सकाळी ०९ वा. श्री गणेश पूजन, सकाळी १० वा. देवतांवर अभिषेक, सकाळी ११.३० वा. श्री सत्यनारायण महापूजा (सिद्धेश्वर मंदिराजवळ), दुपारी १२.३० वा आरती व तीर्थप्रसाद, दुपारी ०१.३० वा. महाप्रसाद, संध्याकाळी 06.00 वा. मुळपुरुष महिला भजन मंडळ, तिलारी शेटवेवाडी यांचा भजनाचा कार्यक्रम व रात्री १०.०० वा.मोरेश्वर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ, मोरे, ता. कुडाळ यांचा वज्रेश्वरी महिमा हा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन तिलारी मित्रमंडळ / शेटवेपरीवार यांनी केला आहे. सर्व कार्यक्रम  तिलारी (शेटवेवाडी) येथे होणार आहेत.