५८ ग्रामपंचायत साठी १३२७ अर्ज सरपंच २२३ तर सदस्यसाठी ११०४ अर्ज दाखल

जानवली ३१, तर सांगवे येथे सदस्य पदासाठी ३० असे सर्वाधिक अर्ज
Edited by: उमेश बुचडे
Published on: December 03, 2022 11:04 AM
views 198  views

कणकवली : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कणकवली तालुक्यात शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी सरपंच पदासाठी १४९ तर सदस्य पदासाठी ७३९ असे एकूण ८८८ जणांची नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत.अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार आर. जे. पवार यांनी दिली.तालुक्यात आतापर्यंत ५८ ग्रामपंचायतसाठी सरपंच पदासाठी २२३ तर सदस्य पदासाठी ११०४ अशा एकूण १३२७ जणांची नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. घोणसरी, हरकुळ खुर्द, कासरल,लोरे, सातरल, शिवडाव या गावांच्या ग्रामपंचायतीसाठी रात्री उशिरापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. निवडणुकीसाठी ऑफलाईन अर्ज भरण्याच्या सुचना तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी रमेश पवार यांनी दिल्यानंतर कार्यकर्त्याची आणि इच्छूक उमेदवारांची येथील तहसीदार निवडणूक विभागात मोठी गर्दी शुक्रवारी सकाळपासूनच झाली होती. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी मुदत असल्याने मोठी गर्दी होती.वेळ संपण्यापूर्वी सर्व उमेदवारांना तहसील कार्यालयात प्रवेश देण्यात आला. त्यानंतर प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास ही प्रक्रिया संपली. शुक्रवारी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जामध्ये जानवली ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी ३१ ,सांगवे येथे सदस्य पदासाठी ३० असे सर्वाधिक अर्ज दाखल झाले आहेत.