मुंबईत विविध ठिकाणी १२ ‘गोविंदा’ जखमी; रूग्णालयात उपचार सुरू

नायर रुग्णालयात पाच, केईएम, जोगेश्वरी ट्रामा, कांदिवली डॉ आंबेडकर रुग्णालय याठिकाणी प्रत्येकी एक जण दाखल
Edited by: मुंबई प्रतिनिधि
Published on: August 19, 2022 18:01 PM
views 256  views

मुंबईत तब्बल दोन वर्षानंतर दहीहंदीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. विविध ठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी पथकांनी गर्दी केली आहे. सकाळपासून आतापर्यंत विविध ठिकाणी १२ गोविंदा जखमी झाले आहेत.

विविध शासकीय आणि पालिका रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार नायर रुग्णालयात पाच, केईएम, जोगेश्वरी ट्रामा, कांदिवली डॉ आंबेडकर रुग्णालय याठिकाणी प्रत्येकी एक जण दाखल झाले आहेत.