
सावंतवाडी : रोटरी क्लब, सावंतवाडी आणि श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना व्यवसायीक मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने रोटरी क्लब, सावंतवाडीने "करियर गायडन्सचे आयोजन केले. या उपक्रमात 125 विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. याकार्यक्रमाचे नियोजन इव्हेट-चेअरमन रो.प्रा.सचिन देशमुख यानी केले. या कार्यक्रमात वक्ते म्हणून रो.CA. सुधीर नाईक यानी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. यावेळी क्लब सचिव रो. प्रवीण परब, रो. सचिन देशमुख, प्रा. राव सर, प्राबर्वे सर, सावंत सर, आणि कॉलेज मधील विद्यार्थी उपस्थित होते.