
वेंगुर्ला : वेंगुर्ला नगरपरिषदेच्या कर विभागाकडून मालमत्ता थकबाकीदारांवर कडक कारवाई करण्यास सुरूवात झाली आहे. मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कर निरीक्षक स्नेहल शिदे, मंदार चौकेकर, सीताराम काळप यांच्या जप्ती पथकाद्वारे कॅम्प म्हाडा येथील १२ मालमत्ता सील करण्यात आल्या.
वेंगुर्ला शहरामध्ये निवासी, बिग निवासी, मिश्र व औद्योगिक अशा एकूण ६ हजार ५५३ नोंदणीकृत मालमत्ता आहेत. वेंगुर्ला नगरपरिषदेकडून वारंवार आवाहन करूनही कर न भरणा-या थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत सुट्टीच्यादिवशीही कर भरणा करण्याकरीता नागरी सुविधा केंद्र सुरू ठेवण्यात आले आहे. शहरातील थकित पाणीपट्टी तात्काळ भरणा करून नळ तोडणीची कारवाई टाळावी तसेच मालमत्ता कर भरणा करून मालमत्ता जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले आहे.