वेंगुर्ल्यातील १० वी व १२ गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

दीपकभाई केसरकर मित्रमंडळ व वेंगुर्ला तालुका शिवसेनेचे आयोजन
Edited by: दिपेश परब
Published on: June 12, 2024 14:13 PM
views 144  views

वेंगुर्ला :  वेंगुर्ला तालुक्यात १० वी व १२ वी परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकानी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम दिपकभाई केसरकर मित्रमंडळ व वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या वतीने रविवार दिनांक १६ जून रोजी सकाळी १०.३०  वाजता येथील स्वामिनी मंगल कार्यालयात करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व विद्यालय व महाविद्यालयातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकानी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी उपस्थित राहावे असे आवाहन दीपकभाई केसरकर मित्रमंडळ व शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी केले आहे.