
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गात १०८ सेवा बंद राहणार आहे. विविध मागण्यांसाठी 108चे 28 चालकांनी धरणे आंदोलन छेडलंय.
'समान काम, समान वेतन' तत्वावर वेतन व भत्ते १४ ऑगस्ट २०२४ च्या अधिसूचनेनुसार कुशल दर्जाचे वेतन अदा करावे ८ तासांपेक्षा जास्त कामाबाबत दुप्पट दराने मोबदला, सर्व प्रकारच्या कायदेशीर रजा व रजेचे वेतन कॅशलेस आरोग्य विमा, ८.३३ टक्के वार्षिक बोनस, वाहन धुलाई भत्ता १० तारखेच्या आत वेतन, ५ वर्षांनंतर ग्रॅज्युटी, फुल अलाउंस आदी मागण्यांसाठी जिल्ह्यातील १०८ वृग्णवाहिका चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बेमुदत धरणे आंदोलन छेडले आहे. यामुळे जिल्ह्यातील १०८ वृग्ण सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.