राज्यातील 'हे' १०८ रुग्णवाहिका चालक संपावर जाणार नाहीत

Edited by: विनायक गावस
Published on: August 28, 2023 17:59 PM
views 304  views

सावंतवाडी :  राज्यातील १०८ रुग्णवाहिका चालवणारे चालक संपावर जाणार आहेत. 108 वाहनचालक संघटनेने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले होते. मात्र, या विषयावर अद्याप देखील तोडगा न निघाल्याने बेमुदत संप पुकारला आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्यसेवा व रूग्णांची परिस्थिती पाहता सिंधुदुर्ग १०८ च्या चालकांनी रूग्णसेवा ईश्वर सेवा मानून यात सहभागी होणार नाहीत अशी ग्वाही दिल्याची माहिती १०८ डिस्ट्रिक्ट मॅनेजर विनायक पाटील यांनी दिली.

महाराष्ट्र राज्यात आपत्कालीन मोफत वैद्यकीय आरोग्य सेवा 108  ही 2014 पासून सुरु करण्यात आली आहे. ही रुग्णवाहिका चालवणारे चालक हे 2014  सालापासून अत्यंत कमी पगारात काम करत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र रुग्णवाहिका क्रमांक 108 वाहनचालक संघटनेने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले होते. मात्र, या विषयावर अद्याप देखील तोडगा न निघाल्याने महाराष्ट्रातील 108 रुग्णवाहिकेवर काम करणाऱ्या चालकांनी बेमुदत संप १ सप्टेंबरपासुन पुकारला आहे. 

मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०८ चालकांनी रूग्णसेवा ही ईश्वरसेवा मानून या संपात सहभागी होणार नसून रूग्णसेवा देणार असल्याची ग्वाही दिली आहे. त्याबाबतच पत्रही दिले आहे अशी माहिती १०८ चे डिस्ट्रिक्ट मॅनेजर विनायक पाटील यांनी दिली आहे. तर या आधी ज्याप्रमाणे १०८ च्या माध्यमातून सिंधुदुर्ग वासियांना सेवा दिली तशीच यापुढेही देणार असं मत पाटील यांनी व्यक्त केले. याप्रसंगी साईसिद्देश मेस्त्री, रामचंद्र देसाई, अवधूत परूळेकर आदी उपस्थित होते.