
मालवण : संजय गांधी निराधार योजनेतील ५० व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना गट ब मधील ५४ असे एकूण १०४ प्रस्तावांना संजय गांधी निराधार योजना समिती सभेत मंजुरी देण्यात आली अशी माहिती समिती अध्यक्ष महेश मांजरेकर यांनी दिली.
संजय गांधी निराधार योजना समितीची सभा समिती अध्यक्ष महेश मांजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात संपन्न झाली. यावेळी समिती सदस्य राजेंद्र आंबेरकर, राजेश तांबे, राजन माणगावकर, मधुकर चव्हाण, माधुरी मसुरकर, तहसीलदार वर्षा झालटे, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, रुंदा पाटकर, यासह संजय गांधी समिती कर्मचारी उपस्थित होते.
या सभेस संजय गांधी निराधार योजनेतील ५० व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना गट ब मधील ५४ असे एकूण १०४ प्रस्ताव मंजूरसाठी ठेवण्यात आली होती. या सर्व १०४ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. अजूनही जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन समितीच्या वतीने अध्यक्ष महेश मांजरेकर यांनी केले.