१००० भरले | परीक्षा सेंटर कोल्हापूरला आले | तरीही ताटकळत उभे रहावे लागले

सिंधुदुर्गातील मुलांना वाली कोणी नाही राहिले..?
Edited by: उमेश बुचडे
Published on: August 22, 2023 11:20 AM
views 560  views

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र मध्ये सर्व ठिकाणी तलाठी भरतीची परीक्षा सुरू आहे. सोमवार दिनांक २१ ऑगस्ट रोजी तलाठी भरती परीक्षा सुरू असताना  सर्वर डाऊन झाला त्यामुळे तब्बल दीड ते दोन तास परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर ताटकळत उभे राहावे लागले होते. 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर म्हणजे वीस ते पंचवीस दिवस वेगवेगळ्या सारख्यांना ही परीक्षा सुरू राहणार आहे. दिवसाला 3 शिफ्ट मध्ये परीक्षा घेतली जाते सकाळी 9 ते 11, दुपारी 12.30 ते 2.30 , आणि 4.30 ते 6.30 हा परीक्षेचा वेळ असून या टाइमिंगच्या आधी दीड तास परीक्षा केंद्रावर आपले रंगीत ओळखपत्र ,1 फोटो , आणि फोटो आयडी जसे की आधार कार्ड ,मतदान कार्ड ,पॅन कार्ड, हे घेऊन यावे लागते तरच परीक्षेला बसू देतात.

सिंधुदुर्ग एकही परीक्षा केंद्र उपलब्ध नसल्याने कोल्हापूर मध्ये विद्यार्थी परीक्षेसाठी जात आहेत कोल्हापूरला आठ परीक्षा केंद्रांमध्ये ही परीक्षा घेतली जात आहे. शासन स्तरावर परीक्षेसाठी टीसीएस या नामांकित कंपनीची परीक्षा घेण्यासाठी निवड केली आहे. 10 लाख पेक्षा जास्त परीक्षार्थी या परीक्षेसाठी बसले असून परीक्षा फी प्रत्येकी  1000 रुपये या विद्यार्थी भरलेली आहे.पण  21 ऑगस्ट रोजी सकाळी  सपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरोवर डाऊन असल्याने तब्बल दीड ते दोन तास उशिरा सुरू झाली त्यामुळे परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांना ताटकळत बसावे लागले होते. 

24 तास रात्रंदिवस प्रवास करून परीक्षा केंद्रावर रात्र अपीरात्री पोहोचायचं त्यानंतर राहायचं याचा पत्ता नाही पण त्या सर्व अडचणींना तोंड देऊन फक्त परीक्षा द्यायची यासाठी हे सर्व परीक्षार्थी लक्षात ठेवतात आणि एवढ्या सर्व प्रसंगाला सामोरे जातात पण जर परीक्षा वेळेवर होत नसेल तर जाण्या येण्याचा खर्च डबल होतो व मोठा आर्थिक भुर्दंड बसून खूप मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे काही परीक्षार्थींचे म्हणणे आहे