
देवगड : देवगड तालुक्यातील जामसंडे येथील मोरेश्वर गोगटे प्रशालेचा गणित संबोध परीक्षेत १००% निकाल लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळा कडून घेण्यात आलेल्या इयत्ता ५वी ते ८वी च्या
७४ विद्यार्थ्यानी प्रथम श्रेणी प्राप्त केली असून सर्वच्या सर्व विद्यार्थी प्राविण्य परीक्षेस पात्र ठरले आहेत.यशस्वी विद्यार्थ्यांना गणित शिक्षक विनायक जाधव व सुजित फडके यांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष-.अजितराव गोगटे ,सचिव -प्रवीण जोग ,शाळा समिती अध्यक्ष- प्रसादमोंडकर,मुख्याध्यापक.संजय गोगटे व सुनील जाधव यांनी अभिनंदन केले आहे.