गणित संबोध परीक्षेमध्ये RPD चा निकाल शंभर टक्के

विराज साळगावकरला १०० पैकी १०० गुण
Edited by: विनायक गावस
Published on: September 15, 2023 19:18 PM
views 233  views

सावंतवाडी : विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळाशी संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ यांच्यावतीने दरवर्षी ५ वी व ८ वी साठी गणित संबोध परीक्षा आयोजित केली जाते. यावर्षीही दरवर्षीप्रमाणे राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. इ.०५ वी व ०८ वी मध्ये अनुक्रमे १५ व २२ असे एकूण ३७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यात ३७ पैकी ३७ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. तर प्रशालेचा निकाल १०० टक्के लागला आहे.


५ वी तील साळगावकर विराज विष्णू याने १०० पैकी १०० गुणांसह प्रथम, मेस्त्री स्वरा मंगेश , कु. पालकर साईना संतोष , कु. बिरोडकर सोहम भिकाजी व कु. नाईक अनघा प्रसाद यांनी 98 गुणांसह संयुक्तपणे द्वितीय तसेच कु. पिळगावकर आदित्य किरण , कु. नाईक अथर्व जगदीश यांनी 96 गुणांसह संयुक्तपणे तृतीय क्रमांक पटकावला यांच्यासह सर्व १३ विद्यार्थ्यांनी प्राविण्यासह प्रथम व ०२ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली. 


०८ वी मधून कु. गावडे वेद श्रीराम याने 94 गुणांसह प्रथम , कु. गावडे प्रचिती चंद्रकांत , कु. राणे गिरीजा मनिष यांनी 92 गुणांसह संयुक्तपणे द्वितीय तसेच कु. परब आयुष प्रविण , कु. साटेलकर सुयोग संजय व कु. रेडकर निषाद प्रशांत यांनी 90 गुणांसह संयुक्तपणे तृतीय क्रमांक पटकावला. यांच्यासह १७ विद्यार्थ्यांनी प्राविण्यासह प्रथम श्रेणी तर ०५ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली. इ.०५ व ०८ वीमधून सर्व असे सर्व ३७ विद्यार्थी गणित प्राविण्य परीक्षेसाठी पात्र ठरले या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षकवृंद व पालकवर्ग या सर्वांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष विकास सावंत, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर व सर्व संस्था सदस्य तसेच मुख्याध्यापक जे. व्ही. धोंड उपमुख्याध्यापक ए. व्ही. साळगांवकर , पर्यवेक्षक पी.एम.सावंत व उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक यांनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.