नुपूर कला मंदिरचा १०० टक्के निकाल..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 16, 2024 15:05 PM
views 81  views

देवगड : देवगड अखिल भारतीय गांधर्व हे. महाविद्यालय मंडळ, मिरज यांच्यावतीने की नोव्हेंबर-डिसेंबर २०२३ मध्ये घेण्यात र आलेल्या नृत्य परीक्षेचा नुपूर कला मंदिर- देवगड़ या संस्थेचा १०० टक्के निकाल लागला आहे. या संस्थेमार्फत - एकूण २४ विद्यार्थिनी परीक्षेमध्ये प्रविष्ट झाल्या होत्या. यात विशेष योग्यता श्रेणीत ११, तर प्रथम श्रेणीत १२ विद्यार्थिनी प्रविष्ट झाल्या होत्या. प्रारंभिक परीक्षेला एकूण ११ विद्यार्थिनी प्रविष्ट झाल्या होत्या. त्यातील नऊ विद्यार्थिनींना विशेष योग्यता, तर दोन विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत.

प्रवेशिका प्रथम या परीक्षेला एकूण पाच विद्यार्थिनी प्रविष्ट झाल्या होत्या. यातील दोन विद्यार्थिनी विशेष योग्यता श्रेणीत, तर ३ विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. प्रवेशिका पूर्ण या परीक्षेला एकूण ७ विद्यार्थिनी प्रविष्ट झाल्या होत्या. त्यातील ६ विद्यार्थिनींनी प्रथम श्रेणीत, तर एक विद्यार्थिनी द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाली आहे. विशारद पूर्ण या परीक्षेत कु. तन्वी किशोर पाध्ये ही विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे.

नुपूर कला मंदिराच्या विद्यार्थिनींनी नृत्य परीक्षेत यश मिळविले. सर्व विद्यार्थिनींना नुपूर कला मंदिरच्या संचालिका अनुजा अनिल गांधी यांचे मार्गदर्शन लाभले. कथ्थक नृत्य परीक्षेसाठी हार्मोनियम आणि गायन कुडाळ येथील अमित उमळकर व तबल्याची साथ अतुल उमळकर यांनी केली.