
वैभववाडी : तालुक्यातील अर्जुन रावराणे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या विद्यालयाचा विद्यार्थी उत्कर्ष लक्ष्मण हांडे हा तालुक्यात द्वितीय व शाळेत प्रथम आला. या विद्यालयातून 56 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते.
यामध्ये उत्कर्ष लक्ष्मण हांडे 95 .40टक्के गुण मिळवत प्रथम आला. दीपराज प्रकाश झोरे याने (94. 60)टक्के मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला.तर प्रारब्ध प्रकाश पाटील यांनी 89 टक्के मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला. याही वर्षी 100टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयातील सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे स्थानिक समिती अध्यक्ष जयेंद्र रावराणे, मुख्याध्यापक भास्कर नादकर यांनी अभिनंदन केले.