
वैभववाडी : तालुक्याचा दहावीच्या परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. माधवराव पवार विद्यालयाचा अथर्व जयवंत मोरे, ऋग्वेद मंदार विजारपुरे ९५.६० टक्के मिळवून तालुक्यात प्रथम तर अर्जुन रावराणे विद्यालयाची अनुष्का तानाजी कांबळे ९४.४० द्वितीय व अभिनव विद्यामंदिर सोनाळीची सृष्टी दिपक पाटील ९४.२० टक्के तृतीय व कोकीसरे हायस्कूलचा भुपाल महेश रावराणे ९३.६० तालुक्यात चतुर्थ क्रमांकांने उत्तीर्ण झाला. तालुक्यातील १७ विद्यालयातुन ४४४ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते.