100 टक्के ; विद्या विहार इंग्लिश स्कूल, आरोसची परंपरा कायम

श्वेता मडुरकर 91. 02 टक्क्यांसह प्रथम
Edited by: जुईली पांगम
Published on: June 02, 2023 17:28 PM
views 238  views

सावंतवाडी : विद्या विहार इंग्लिश स्कूल, आरोसचा निकाल 100 टक्के लागलाय. गेल्या कित्येक वर्षांची परंपरा यंदाही या हायस्कूलने कायम राखलीय. श्वेता सुरेश मडुरकर 91. 02 टक्के गुण घेत शाळेतून पहिली आलीय. अंकिता महेंद्र मोरजकर 90. 08 टक्क्यांसह दुसरी आलीय. लावण्या संतोष पिंगुळकर 90. 02 टक्के गुण मिळवत तिसरी आलीय. 

शाळेचे मुख्याध्यापक सदाशिव धुपकर, वर्गशिक्षक मोहन पालेकर यांसह सर्व शिक्षकांनी मेहनत घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं होत.